राज्यभरातील शाळांचे रूप पालटणार; राज्य सरकारने ‘हा’ मोठा निर्णय

उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यातील शाळांचे रूप पालटणार आहे. यासाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळते आहे. राज्यातील शाळा आदर्श शाळा करण्याचे उद्दिष्ट शासनाने पुढे ठेवले आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात एकूण ४८८ शाळा निवडण्यात आल्या आहेत. या शाळांसाठी ४९४ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. याद्वारे ‘आदर्श शाळा योजना’ राबवण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये शाळांचे बांधकाम करण्यासाठी १०० कोटींचा निधी पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उर्वरित ३९४ अर्थसंकल्पामधून किंवा पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध होणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

दरम्यान या योजनेत शाळा निवडीसाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. यामध्ये वाढता लोक सहभाग, भविष्यात वाढती पटसंख्या व किमान १०० ते १५० पटसंख्या, शालेय पूर्व प्राथमिक वर्ग, आकर्षक इमारत, वर्ग खोल्या, मुलां-मुलींकरीता स्वच्छता गृहे, पेयजल सुविधा व हँड वॉश स्टेशन अशा विविध निकषांवर शाळांची निवड केली जाणार आहे. या योजनेद्वारे आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या दृष्टीने सुसज्ज भौतिक सुविधांची उपलब्धी , वर्गखोल्या , संगणकीकरण , शाळा दुरुस्ती , शैक्षणिक साहित्य इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या निधीचा उपयोग केला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या –