‘तुला पाहते रे’ फेम जयदीप या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा

सुबोध भावे, गायत्री दातार यांची प्रमुख भूमिका असलेली झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. अल्पवाधित या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात जागा मिळवली आहे. ही मालिका टीआरपीमध्येही अव्वल आहे. या मालिकेत सुबोध भावेच्या लहान भावाची म्हणजेच जयदीप सरंजामेची भूमिका साकारली आहे ती आशुतोष गोखले यानं. विक्षिप्त, रागीट, स्वत:ची अक्कल न वापरणारा, लाडाकोडात वाढलेल्या जयदीपची भूमिका आशुतोषनं उत्तम साकारली.

सुबोध, गायत्रीसोबत आशतोषचंही काम प्रेक्षकांना आवडत आहे. विशेष म्हणजे आशुतोष हा सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांचा मुलगा आहे. मराठी रंगभूमी, रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उठवलेल्या विजय गोखले यांच्याकडून आशुतोषनं अभिनयाचं बाळकडू घेतलं आहे. मालिकाव्यतिरिक्त आशुतोषनं रंगभूमीवर काम केलं आहे. तर याच मालिकेत ईशा म्हणजेच गायत्री दातार यांच्या आईची भूमिका साकारत असलेल्या गार्गी फुले थत्ते या सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेते निळु फुले यांच्या कन्या आहेत. गार्गी यांनी साकारलेली सौ. निमकर यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.