TVS ची इलेक्ट्रिक स्कुटर TVS iQube भारतीय बाजारात, 5 हजार रुपयांमध्ये बुकिंगला सुरूवात

TVS ची नवीन इलेक्ट्रिक स्कुटर TVS iQube भारतीय बाजारात उतरवली आहे. ही इलेक्ट्रिक स्कुटर अ‍ॅडव्हान्स इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेन आणि नेक्स्ट-जेनरेशन TVS SmartXonnect प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. कंपनीच्या वेबसाइट किंवा डिलरशिपवर 5 हजार रुपयांमध्ये या स्कुटरसाठी बुकिंगला सुरूवात झालीये. पण सध्या ही स्कुटर केवळ बेंगळुरूमध्येच विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र लवकरच ही स्कुटर देशातील अन्य मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध होईल.

TVS iQube स्कुटरमध्ये 4.4 kW इलेक्ट्रिक मोटार आहे. स्कुटरमध्ये लिथियम-आयन बॅटरी असून पूर्ण चार्ज होण्यासाठी पाच तासांचा वेळ लागतो. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर 75 किलोमीटरपर्यंत धावेल असा कंपनीचा दावा आहे. 0 ते 40 किलोमीटर प्रतितास वेग पकडण्यासाठी 4.2 सेकंदाचा वेळ लागेल. स्कुटरचा टॉप स्पीड 78 किलोमीटर प्रतितास असून स्कुटरमध्ये पावर आणि इकॉनॉमी असे दोन रायडिंग मोड आहेत.या स्कुटरमध्ये कनेक्टेड टेक्नॉलॉजी असून अ‍ॅडव्हान्स टीएफटी क्लस्टर आणि iQube अ‍ॅपसह नवीन TVS SmartXonnect कनेक्टेड प्लॅटफॉर्म आहे.

स्कुटरमध्ये जिओ-फेंसिंग, नेव्हिगेशन असिस्ट, रिमोट बॅटरी चार्ज स्टेटस, लास्ट पार्क लोकेशन, इनकमिंग कॉल अलर्ट आणि एसएमएस अलर्टसह अन्य फीचर्स आहेत. याशिवाय क्यू-पार्क असिस्ट, डे अँड नाइट डिस्प्ले आणि रिजनरेटिव ब्रेकिंग यांसारखे फीचर्सही आहेत.आयक्यूब इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 1.15 लाख रुपये असून ही किंमत बेंगळुरुमधील ऑन-रोड किंमत आहे. कंपनीच्या वेबसाइट किंवा डिलरशिपवर 5 हजार रुपयांमध्ये या स्कुटरसाठी बुकिंगला सुरूवात झालीये.