राज्यात कोरोनाच्या साडेबारा लाख चाचण्या – राजेश टोपे

राजेश टोपे

९५ हजार ६४७ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६ टक्के

मुंबई – राज्यात आज ५३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ३२ हजार ६२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७८६२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ५३ हजार ९७८ नमुन्यांपैकी २ लाख ३८ हजार ४६१ नमुने पॉझिटिव्ह (१९.०१ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ७४ हजार २५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ५६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महत्वाच्या बातम्या –

प्रधानमंत्री आवास योजनेतून ग्रामीण भागात ४ लाख २१ हजार घरे

फळबागांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देणार – अजित पवार