राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अतिजोरदार पावसाची शक्यता

कृत्रिम पाऊस

पुणे – मागील काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी चांगलाच वेग पकडला आहे. सध्या मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून उत्तरेकडे वाटचाल केली आहे. दरम्यान मागील आठवड्यापासूनच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. येत्या चार ते पाच दिवस कोकण, घाटमाथा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर उर्वरीत राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि मुंबई या भागांत आज आणि उद्या या दोन दिवस अतिजोरदार पावसाचा इशारा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही अतिवृष्टीचा होण्याची शक्यता हवामान खात्याने वार्तिवली आहे.

तर राज्यात आज – संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ  उद्या – संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –