दोन सोसायट्यांनी तर पणन महासंघाच्या दोन केंद्रांनी केली धान खरेदी बंद

शेतकऱ्यांचा धान विक्रीचा कल आता सोसायट्यांकडे वाढला आहे. आतापर्यंत आठ आदिवासी सोसायट्या व पणन महासंघाच्या दोन केंद्रामार्फत धान खरेदी सुरू होती. मात्र आता दोन आदिवासी सोसायट्यांनी तर पणन महासंघाच्या दोन केंद्रांनी धान खरेदी बंद केली आहे.

कोरडा दुष्काळ घोषित करण्यासाठी दररोज निवेदनांचा पाऊस

नागभीड तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात, असा आजवरचा अनुभव आहे. शासनाने यावर्षी तालुक्यातील काही आदिवासी सोसायट्यांना व पणन महासंघाने संस्था संचालित करीत असलेल्या भात गिरण्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत.

तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाचे भाव एक हजार ९०० ते २ हजार रूपयांच्या पलिकडे नसल्याची माहिती आहे. दरम्यान ही तफावत लक्षात घेता बहुतांशी शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आपला मोर्चा आदिवासी सोसायट्या व पणन महासंघाच्या केंद्राकडे वळविला आहे. मात्र गोविंदपूर सोसायटीने बारदाना उपलब्ध नसल्यामुळे धान खरेदी बंद केली आहे. तर सावरगाव सोसायटीने धान ठेवण्यासाठी जागा आणि बारदानाही उपलब्ध नसल्याने धान खरेदी बंद केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.