Uddhav Thackeray | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांनी राज्यपाल म्हणून पाठवलेले पार्सल परत घ्यावे. राज्यपालांना पाठवलेला नमुना परत मागवून इतर ठिकाणी किंवा वृद्धाश्रमात पाठवण्याची आमची केंद्राला विनंती आहे.
केंद्र सरकारने राज्यपालांना तातडीने हटवावे, अन्यथा दोन-चार दिवसांत महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार, किंवा सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र बंद करु, असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला आहे.
“राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचा जुना आदर्श असे वर्णन केले आहे. बाप हा बाप असतो, तो जुना-नवा नसतो. सावित्रीबाई फुले यांच्यावरही त्यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. महाराष्ट्राच्या अस्मितेशी ते खेळत आहेत. मुंबई आणि ठाण्याबाबतही अशीच वादग्रस्त विधाने करून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांची खिल्ली उडवली आहे. गुजरात आणि राजस्थानच्या लोकांनी मुंबई सोडली तर काय उरणार आहे, असे ते म्हणाले होते,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. साधारणता एक प्रघात आहे की, ज्याचं सरकार केंद्रात असतं, त्यांचीच माणसं किंवा त्यांच्याच विचारसरणीची माणसं देशातील विविध राज्यात किंवा सगळ्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून पाठवली जातात. या माणसांची कुवत काय असते, या माणसांची पात्रता काय असते?”
“जरासा एक शब्द वापरतोय कुणी गैरसमज करू नये, म्हणजे खास करून ज्येष्ठ नागरिकांबद्दल मी बोलतो आहे. ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? हा सुद्धा एक प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे आणि राज्यपाल नियुक्तीचे निकष सुद्धा ठरवायला पाहिजेत, असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray |”उद्या पाकिस्तान निवडणुकीसाठी आपल्या देशात सुट्टी देतील” ; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला टोला
- IND vs NZ | कोण कोणावर भारी?, जाणून घ्या हेड-टू-हेड सामन्यातील आकडेवारी
- Dry Skin Tips | त्वचेवरील कोरडेपणा दूर करायचा असेल, तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश
- Uddhav Thackeray | “ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून…”; उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल
- Uddhav Thackeray | या महाराष्ट्र द्रोह्यांना बाहेर काढले पाहिजे ; उद्धव ठाकरे आक्रमक