‘काँग्रेसने आता कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरी बसावे’- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर २५ मे रोजी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन महिनाभरात नवीन अध्यक्ष निवडण्यास सांगितले होते. मात्र,अद्यापही नवा अध्यक्ष निवडला गेला नसल्याने राजकीय वर्तुळात काँग्रेस अध्यक्ष पदाच्या चर्चेला ऊत आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने ‘काँग्रेसने आता कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरी बसावे’ असा सल्ला काँग्रेसला मुखपत्रातुन दिला आहे.

अध्यक्षपदावरुन सध्या काँग्रेस पक्षामध्ये जी काही संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. त्यावर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत काँग्रेसच्या नेत्यांवर त्यांनी सडकून टीका केली आहे. काँग्रेसच्या ऱ्हासाला नेहरू–गांधी परिवार जबाबदार नाही, तर ज्यांनी वर्षानुवर्षे काँग्रेसचे मीठ खाल्ले असेच सर्व लोक जबाबदार आहेत. असा आरोप करत ज्या काँग्रेसला एक महिन्यानंतरही स्वतःचा अध्यक्ष निवडता येत नाही, त्या काँग्रेसने आता कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरी बसावे हेच बरे. असा सल्ला ठाकरे यांनी दिला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

वनजमिनीवर अतिक्रमण केलेल्या शेतात नवनीत कौर यांनी केली पेरणी

आमदार बच्चू कडूंना शिवसेनेकडून ऑफर..

Add Comment

Click here to post a comment
Loading…