लाचारी माझ्या रक्तात नाही : उद्धव ठाकरे

शिर्डी : लाचारी माझ्या रक्तात नाही, स्वाभिमानानेच जगू, मला वडिलांनी लाचारी शिकवलीच नाही, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते शिर्डीमध्ये बोलत होते.खोटं बोल, पण रेटून बोल, या पद्धतीने सध्या कारभार सुरु आहे, अशी टीकाही त्यांनी भाजप सरकारवर यावेळी केली.दरम्यान, मोदी सरकारने जनतेला फसवलं आहे. तुम्हाला निवडणुकी्च्या अगोदर घरे देणं हा भाजपचा जुमला आहे. त्यामुळे भाजप जनतेची फसवणूक करत आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

शिर्डी येथे शिवसेनेच्या मंचावर शिवरायांबरोबरच श्रीरामाचीही मूर्ती ठेवण्यात आली होती.मला खुर्ची नको फक्त जनतेचं प्रेम मिळत राहो’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

संभाव्य उमेदवारांबाबत उत्सुकता

लोकसभेच्या जिल्ह्यातील शिर्डी व नगर या दोन्ही जागांवरील शिवसेनेचे उमेदवार पक्षप्रमुख ठाकरे रविवारीच जाहीर करणार असल्याचे सांगितले जाते. शिर्डीत विद्यमान खासदार लोखंडे यांच्यासह नाशिकचे माजी मंत्री बबनराव घोलप यांचे तर नगर मतदारसंघातून माजी आमदार अनिल राठोड, पारनेरचे विद्यमान आमदार विजय औटी व श्रीगोंद्याचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांची नावे चर्चेत आहेत.