मुख्यमंत्र्यांसोबत उद्धव ठाकरे करणार विठ्ठल-रखुमाईची महापुजा- सूत्र

विठ्ठल-रखुमाईची महापुजा

अनेक वर्षांपासून प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री आपल्या पत्नीसोबत विठ्ठलाची पूजा करण्याची प्रथा आहे. पण यावेळेस फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूजा करणार नाहीयेत, तर त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही विठ्ठलाची पूजा करताना दिसणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच उद्धव ठाकरे शिवसेनेच्या विजयी 18 खासदारांनाही आपल्यासोबत पंढरपूरला घेऊन जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने पंढरपूरात महासभा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते. त्यानंतर आता येत्या विधानसभा निवडणुकीत विठ्ठलाचे दर्शन घेऊन भाजप-शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या वारी दरम्यान दिल्लीत अधिवेशन सुरू होते, त्यामुळे त्यांना काही खासदारांना दिल्लीत घेऊन जाता आले नव्हते. पण आता आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या सोबत सर्व खासदारांना घेऊन विठ्ठल-रखुमाईची महापुजा करणार असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या –

मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासांत अतिवृष्टी – हवामान खाते

किसान क्रेडिट कार्डवर मिळणार बिनव्याजी कर्ज