उदगीर, कर्जतला नवीन एमआयडीसी – आदिती तटकरे

आदिती तटकरे

उदगीर आणि कर्जत येथील नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी तत्वत: मान्यता देण्यात आली असून यामुळे रोजगार निर्माण होणार असल्याचे  आदिती तटकरे यांनी काल सांगितले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 385 वी बैठक मंत्रालयातील दालनात आयोजित केली होती. त्यावेळी कुमारी तटकरे बोलत होत्या.

कर्जत येथील एमआयडीसी उभारण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेची पाहणी करण्याचे निर्देश उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कर्जत येथेही एमआयडीसी उभारणार असल्याने अधिकाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार रोहित पवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अनबलगन, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय काटकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

बीड आणि नांदेड जिल्ह्यात सीताफळावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात येतील – जयदत्त क्षीरसागर

शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यासाठी मोफत सामायिक सुविधा केंद्र

सरकारचा राधाकृष्ण विखे पाटलांना शह देण्याचा प्रयत्न

शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा कंपन्यांनी धंदा मांडला ; बच्चू कडू