पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत सर्वसाधारण शेतकर्‍यांना मिळतंय ८० ते ९० टक्के अनुदान

शेती करताना पिंकासाठी पाणी मिळणे हे खूप महत्वाचं आहे. जर शेतीसाठी सिंचनाची पुरेशी व्यवस्था नसेल तर पाण्याअभावी शेती करताना शेतकऱ्याला अनेक अडचणींचा येतात. शेतीमध्ये सिंचनाच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकरी शेतामध्ये पाण्याची बचत मोठ्या प्रमाणात करू शकतो. यामुळे शेतीसाठी होणाऱ्या खर्चातही कपात होते. तसेच पिकांचे उत्पादनही चांगले होते आणि त्यातून शेतकऱ्याचे उत्पन्नही वाढते. प्रगत सिंचनाच्या वापर शेतीमध्ये केल्यास कमी पाण्यात पिकाची चांगली वाढ होते, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी शेतकरी स्प्रिंकलर पध्दतीचाही वापर करू शकतात. शेतकऱ्यांना स्प्रिंकलर पाईप खरेदीसाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत अनुदानही  मिळाले जाणार आहे.

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत अनुदान –या योजनेंतर्गत सर्वसाधारण शेतकर्‍यांना ८० टक्के अनुदान दिले जाणार आहे. तर छोट्या आणि सुक्ष्म शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान मिळणार आहे. या योजनेअंतर्गत जो प्रथम येईल त्याला योजनेचा लाभ मिळेल हे तत्व अंवलंबण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात. नोंदणीकृत कंपनीकडून स्प्रिंकलर पाईप खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना खेरादीच्या बिलासह अर्ज कार्यालयात जमा करावा लागणार आहे. हा अर्ज मंजूर झाला की शेतकऱ्यांना खरादीच्या ८० ते ९० टक्के अनुदान दिले जाते.

योजनेची वैशिष्ठ्ये –

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ करणे. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे.कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वृद्धी करणे. समन्वयित पद्धतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषि व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित करणे, त्याची वृद्धी व प्रसार करणे. कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे.

स्प्रिंकलर सिंचन पध्दती –या सिंचन पद्धतीद्वारे आपण जमीन समतल न करता शेताला चांगल्या प्रकारे पाणी देवू शकता. उतार आणि माळावरील असमतल ठिकाणी सिंचन करण्यासाठी ही प्रणाली अत्यंत प्रभावी मानली जाते. लसूण, आले, फुलकोबी, कोबी, बटाटे, वाटाणे, कांदे, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, शेंगदाणे, मोहरी, पालेभाज्या, मसूर, चहा आणि रोपवाटिका याचे या पद्धतीने सिंचन करता येते. सिंचनाच्या या पध्दतीमुळे उत्पादनातही वाढ होते.

महत्वाच्या बातम्या –