राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे ढग ; बळीराजा चिंतेत

टीम महाराष्ट्र देशा : उन्हाला सुरुवात होत नाही तेच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची ढग महाराष्ट्रावर जमा झाले आहेत.

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात 14 मार्च म्हणजे उद्यापासून पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मोहोराचं नुकसान होऊ शकतं, तसंच गहू आणि ज्वारीची कापणी त्वरित करावी, अशी सूचना आयएमडीनं केलीये.

उद्या 14 मार्च, 15 आणि 16 मार्चला पाऊस कायम राहील, तर 17 मार्च रोजी तुरळक पाऊस पडेल, असं भाकित हवामान खात्यानं वर्तवलंय.