‘या’ शेतकऱ्याने शोधून काढला अनोखा उपाय; शेतामध्ये केली देशी दारूची फवारणी

शेतकरी फवारणी

लातूर – अतिवृष्टी तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यातच भाजीपाला व शेती पिकांवर सततच्या होणाऱ्या रोगांमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. हे पिकं वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागते. मात्र जिल्ह्यातील बेलकुंड गावातील शेतकऱ्याने अनोखा उपाय शोधून काढला आहे. मिरची, मेथी तसेच इतर भाजीपाला वाचवण्यासाठी औषधा ऐवजी देशी दारूची फवारणी शेतामध्ये केली आहे.

रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सध्याच्या वातावरणात कितीही महागडे औषध फवारले तरी रोगाचा प्रादुर्भाव कमी हॉट नाही. त्यामुळे १० गुंठे मिरचिवर देशी दरुची फवारणी केली, यामुळे मिरची हिरवीगार दिसत आहे त्याच सोबत कमी वेळात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याचे शेतकरी हणमंत करसुळे यांनी सांगितले. तसेच हा देशी दारूचा प्रयोग अनेक वर्षांपासून करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.

एका देशी दारूच्या बाटलीत १० गुंठे रान फवारणी होते. भाजीपाल्यावर देशी दारू फवारणी केल्याने रंग हिरवागार व उंची झपाटय़ाने वाढत असल्याचेही शेतकरी सांगतात. खऱ्या अर्थाने हा उपाय कितपत योग्य आहे. हा जरी संशोधनाचा भाग असला तरी सध्याच्या वातावरणात कितीही महागडी औषधे फवारली तरी रोगाचा प्रादुर्भाव काही कमी होत नाही. फवारणी झाल्यानंतर एक दोन दिवस झाले की पुन्हा रोगाचा प्रार्दुभाव जाणवू लागला असल्याने शेतकरी अशा प्रयोगातून आपला भाजीपाला वाचविण्याचा प्रयत्न करित असल्याचे चित्र दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या –