राज्यातील ‘या’ भागांमध्ये अवकाळी पाऊस; ज्वारी, हरभरा, मका, गहू  पिकांचे मोठे नुकसान

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७  जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. तर हवामान अंदाजनुसार धुळे जिल्ह्यात ७ जानेवारीला अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,  शिंदखेडा, शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा अनेक भागात अवकाळी पावसाने दणका दिला आहे.  तर या भागात अवकाळी पाऊस झाल्याने ज्वारी, हरभरा, मका, गहू  पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

धुळे जिल्ह्यात सुमारे तीन ते चार मिनिटे काही भागात गारपीट झाली तसेच डिसेंबर महिन्यापासून शेतकरी मोठ्या अडचणीत आहे, कारण डिसेंबर महिन्याच्या  सुरवातीला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये  जोरदार पाऊस झाला. तर डिसेंबर महिन्याच्या शेवटी ,म्हणजेच २७ डिसेंबर ला मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या –