औरंगाबाद मध्ये देशातील ‘सर्वात उंच’ पुतळ्याचे अनावरण ; क्रांती चौकात प्रचंड जल्लोष !

औरंगाबाद

सर्व प्रथम सर्व शिवप्रेमींना शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभॆच्छा.

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने शहरातील क्रांती चौक येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिवजयंती निमित्त तमाम शिवभक्तांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. पर्यटनाची राजधानी(The capital of tourism) व ऐतिहासिक शहर(Historic city) अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहरातील क्रांती चौक व येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विशेष असे महत्व आहे.

शहरातील विविध ठिकाणाहून आलेल्या ढोल पथकांनी अप्रतिम प्रचंड जल्लोषात सादरीकरण करण्यात आले .

पुतळ्याचा अनावरण सोहळा राज्याचे महसूल मंत्री(Minister of Revenue) मा.ना.बाळासाहेबजी थोरात, औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.सुभाषजी देसाई, पर्यावरण मंत्री(Minister of Environment) मा.ना.आदित्यजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

क्रांती चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौथर्‍यासह पुतळ्याची उंची तब्बल 52 फुट आहे. तर चौथर्‍या भोवतीच्या 24 कमानीत 24 मावळ्यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत होत्या. याप्रसंगी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री मा.ना.संदीपानजी भुमरे, ग्रामविकास राज्य मंत्री मा.ना.अब्दूलजी सत्तार, खा.इम्तियाजजी जलील, मा.खा.चंद्रकांतजी खैरे, आ.संजयजी शिरसाठ, आ.अंबादासजी दानवे, आ.उदयसिंगजी राजपूत आदींसह शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या –