टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बाइक्स (Bikes) ची मागणी वाढत आहे. हीच मागणी लक्षात घेत देशातील दुचाकी (Two Wheeler) उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन मॉडेल्स लाँच (Launch) करत असते. त्याचबरोबर अनेक कंपन्या आपल्या बाईक्स नवनवीन फीचर सोबत सादर करत असतात. अशा परिस्थितीत भारतामध्ये या महिन्यात काही दुचाकी उत्पादक कंपन्या आपल्या नवीन बाइक्स लाँच करणार आहेत. जर तुम्ही नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी थोडी वाट पाहणे योग्य ठरेल. कारण देशात लवकरच या धमाकेदार बाईक्स लाँच होणार आहेत.
Hero XPulse 200 4V
देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो (Hero) या महिन्यांमध्ये आपली नवीन बाईक लाँच करणार आहे. त्याचबरोबर लोकांना हिरो बाईक खूप आवडतात. Hero XPulse 200 4V या बाईकची सध्याची आवृत्ती बरीच लोकप्रिय झाली आहे. तर या नवीन बाईक मध्ये पॉवरट्रेनसह लुक मध्ये देखील मोठे बदल असण्याची शक्यता आहे. या बाईकमध्ये अनेक नवीन फीचर देखील असू शकतात. हिरो मोटर क्रोप या महिन्यात ही ऑफ-रोड बाईक लाँच करू शकते.
Ultraviolette F77
Ultraviolette आपली F77 ही बाईक नोव्हेंबर महिन्यामध्ये लाँच करू शकते. ही बाईक तीन लाख रुपयापेक्षा जास्त किमतीमध्ये बाजारात सादर केल्या जाऊ शकते. स्पोर्ट्स बाईक सेगमेंट मधील Ultraviolette F77 हे पहिले इलेक्ट्रिक मॉडेल असेल. कंपनीची ही बाईक एका चार्जमध्ये 300 किलोमीटर पेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम आहे.
Royal Enfield Super Meteor 650
भारतामध्ये रॉयल एनफिल्डच्या बाईकची वेगळीच क्रेझ आहे. अशा परिस्थितीमध्ये रॉयल एनफिल्ड आपली Super Meteor 650 ही बाईक या महिन्यांमध्ये लाँच करणार आहे. रॉयल एनफिल्डने ही बाईक Shotgun 650, Continental GT 650 आणि Interceptor 650 या प्लॅटफॉर्मवर तयार केलेली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chandrakant patil | “माझा हिशोब चुकता करायचा असेल, तर…”; सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा पलटवार
- Andheri By Election | अंधेरी पोट निवडणुकीत नोटा दोन नंबरला; नेमकं कारण काय?, जाणून घ्या
- IND vs ZIM ICC T20 | भारताचे झिम्बाब्वेला १८७ धावांचे लक्ष; केएल राहुल आणि सुर्यकूमारचे अर्धशतके
- Anil Parab | नोटाला एवढी मतं का मिळाली? अनिल परबांनी दिलं उत्तर, म्हणाले…
- Sushma Andhare । अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयानंतर सुषमा अंधारेंची भाजपवर टीका; म्हणाल्या…