Upcoming Cars | 2023 मध्ये मारुतीच्या ‘या’ कार लाँच होणार, तर महिंद्रा सादर करणार ‘ही’ SUV

Upcoming Cars | 2023 मध्ये मारुतीच्या 'या' कार लाँच होणार, तर महिंद्रा सादर करणार 'ही' SUV

Upcoming Cars | टीम महाराष्ट्र देशा: देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपन्या मारुती (Maruti) आणि महिंद्रा (Mahindra) नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कार (Car) सादर करत असतात. पुढच्या वर्षी या कंपन्या काही कार (Upcoming Cars) लाँच करणार आहेत. यामध्ये मारुती सुझुकी तीन नवीन युटिलिटी वाहने सादर करणार आहे. याचबरोबर कंपनीच्या ब्रेझा आणि ग्रँड विटाराच्या सीएनजी आवृत्ती देखील पुढील वर्षी लाँच होऊ शकतात.

ऑगस्ट 2023 पर्यंत मारुती सुझुकी देशामध्ये दोन नवीन SUV लाँच करू शकते. त्याचवेळी कंपनी टोयोटाच्या नवीन इनोव्हा हायक्रॉसवर आधारित MPV देखील पुढच्या वर्षी सादर करू शकते. त्याचबरोबर मारुती सुझुकी 2023 मध्ये ऑटो एक्स्पोत YTB आणि 5- डोर जिमनी लाईफस्टाइल SUV हे कोडनेम देखील सादर करणार आहे.

2023 ऑटो एक्स्पोमध्ये कंपनी मारुती 5-डोर जिमनी सादर करणार आहे. ही कार पर्यायी साईड फेसिंग जंप सीटसह पाच आणि सात सीट लेआउटमध्ये ऑफर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारमध्ये हायब्रीड तंत्रज्ञानासह 1.5L K15B पेट्रोल इंजिन मिळू शकते. त्याचबरोबर ही कार उत्कृष्ट ऑफ-रोडिंग क्षमतेसह बाजारात सादर होणार आहे.

कार उत्पादक कंपनी महिंद्रा आपल्या अत्यंत लोकप्रिय ऑफरोड SUV थारची आवृत्ती पुढच्या वर्षी सादर करणार आहे. सध्याच्या थार  मॉडेलपेक्षा येणाऱ्या गाडीची लांबी थोडी जास्त असेल. त्याचबरोबर येणाऱ्या या नवीन SUV मध्ये जागाही जास्त मिळेल. येणाऱ्या नवीन गाडीचा पावरट्रेन सध्याच्या मॉडेल एवढाच असेल. या नवीन गाडीची चाचणी सुरू झालेली आहे. कारण ही SUV अनेकवेळा स्पॉट झाली आहे.

महत्वाच्या बातम्या