‘या’ जिल्ह्यातील ११ लाख ९६ हजार १८४ शेतकऱ्यांनी भरले ११६० कोटी वीजबिल

शेतकरी

लातूर – मागील काही दिवसांपासून वीजबिल वसुली सुरु आहे. त्यामुळे वीजग्राहक मोठ्या प्रमाणावर वीजबिल भरताना दिसत आहेत. कृषीपंप वीज धोरण २०२० च्या अंमलबजावणीमुळे गावागावांत वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची ओढ सुरु झाली आहे. थकबाकीत तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत सवलत मिळवित गुरुवार पर्यंत ११ लाख ९६ हजार १८४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. ११६० कोटी ४७ लाख रुपयांचा भरणा केलो. या योजनेतील सहभागासोबतच आपल्या ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी तब्बल ७७३ कोटींचा हक्काचा ६६ टक्के निधी मिळणार आहे.

दरम्यान, राज्यातील २ लाख ८७ हजार ६४ शेतकऱ्यांनी चालू वीजबिलांसह सुधारित मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा करून कृषिपंपाच्या वीजबिलांतून शंभर टक्के थकबाकीमुक्ती मिळविली. उल्लेखनीय म्हणजे कोल्हापूर परिमंडलातील ५२, बारामती परिमंडलातील १३ आणि नागपूर परिमंडलातील एका गावाने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीचे चालू व थकीत वीजबिलांची संपूर्ण रक्कम भरून अख्खे गावच थकबाकीमुक्त करण्याचा इतिहास घडविला.

वीजबिलांच्या वसुलीतील तब्बल ६६ टक्के रकमेचा निधी संबंधीत ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. कृषी आकस्मिक निधीत चालू व थकीत वीजबिलांच्या भरण्यातून आतापर्यंत ११६० कोटी ३४ लाख रुपये जमा झाले. त्यापैकी ६६ टक्के रक्कम म्हणजे तब्बल ७७३ कोटी रुपयांचा निधी संबंधीत ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीजयंत्रणेच्या विविध कामांसाठी वापरणार आहेत. औरंगाबाद प्रादेशिक विभागात ९६ कोटी १६ लाख रुपयांचा निधी जमा झाला.

महत्वाच्या बातम्या –