‘या’ जिल्ह्यातील खरीप हंगामात ७३.०२ टक्के कर्ज वाटपाचा दावा; शेतकरी मात्र मागील अनुदानाच्या प्रतीक्षेत

शेती आणि शेतकरी

हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील खरीप हंगामात ७३.०२ टक्के इतकी विक्रमी कर्ज वाटप केल्याचा दावा बँकांनी केला आहे. मागील कोरोना काळात संथ गतीने सुरु असलेले कर्ज वाटपाचे काम आता गती घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात बळीराजा मागील अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.

सन २०२०-२०२१ खरीप हंगामासाठी हिंगोली जिल्ह्याला कर्ज वाटपासाठी २७४ कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३६ कोटी ४ लाख वाटपाच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत ९६.२४ टक्के पूर्ण करण्यात यश आल्याचे सांगण्यात आले आहे. या कामगिरीमुळे बँका जरी आपली पाठ थोपटत असल्या, तरी शेतकरी वर्ग मात्र आपल्या थकीत अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

उन्हाळा असो किंवा पावसाळा बळीराजा मात्र नेहमी संकटाच्या छायेत असतो. त्यात संकट वाढवलं ते कोरोना महामारीने या काळात शासनाने बळीराजाकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यावेळी झालेली नुकसान भरपाई अजूनही बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मिळाली नसताना बँकांचा दावा शेतकऱ्यांना किती सुखावणारा असणार हे येणार काळ सांगेल.

महत्वाच्या बातम्या –