राज्यातील ‘या’ जिल्ह्यात एका दिवसात ८५३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

कोरोना

पुणे : कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून भारतात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

पुणे शहरात आज नव्याने ८५३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ०४ हजार ६४९ इतकी झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात ८ हजार ०१३ नमुने घेण्यात आले आहेत.तर एकूण टेस्ट संख्या आता ११ लाख ६२ हजार ७९८ इतकी झाली आहे.

शहरातील ३८८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या १ लाख ९४ हजार २२९ झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ५ हजार ५५१ रुग्णांपैकी २८१ रुग्ण गंभीर तर ६३० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ४ हजार ८६९ इतकी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –