जालना – जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रूग्ण संख्येमध्ये खुप मोठी वाढ होत आहे. या वर प्रतिबंध करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये सध्या लॉकडाऊन होणार नाही. परंतू गुरुवारी या बाबत पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.
मंगळवारपासून हे बंद
ज्या ठिकाणी तोंडावरचा मास्क काढावा लागतो. अशा प्रकारची सर्व व्यवस्थापने मंगळवारपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यात चहा, भेळपुरी, पाणीपुरी गाडे, छोटी हॉटेल्स, या दुकानांचा समावेश असणार आहे. ज्या हॉटेल मध्ये स्वतंत्र स्वयंपाकाचे गृह आहे, या लॉजिंग अँड बोर्डिंगची व्यवस्था असलेल्या हॉटेलला यामधून वगळले आहे. अशा हॉटेल्समध्ये थांबणारे ग्राहक हे सामान्य माणसांच्या तुलनेमध्ये लोक संपर्कामध्ये कमी येतात. स्वत:च्या खोल्यात जाऊन ते राहतात. स्वयंपाक गृहात येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ देखील कमी असते. त्यामुळे हा निर्णय घेतला. औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या विविध कारखान्यांमध्ये कोरानाची तपासणी बंधनकारक केली आहे.
शुक्रवारपासून लॉक डाऊनची शक्यता ?
आज सर्वांनी लॉक डाऊनला विरोध केला आहे. तरी, शुक्रवारपासून तीन दिवसाचा लॉकडाउन जाहीर करावा अशा सूचनाही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वेळी केल्या. त्यामुळे शुक्रवार, शनिवार, रविवार, असा तीन दिवसाचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता काही अधिकाऱ्याने वर्तवली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मोठी बातमी – ‘लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री ‘या’ दिवशी संबोधित करणार’
- खुशखबर! इयत्ता १ली ते इयत्ता ११वी चे सगळेच विद्यार्थी पास; राज्यपालांनी दिली मान्यता
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आज 8 रात्री वाजेपासून संपूर्ण लॉकडाऊन
- मोठी बातमी – राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ‘हे’ कडक निर्बंध लागू होणार
- शेतीच्या माध्यामातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढीसाठी ग्रामपंचायतींना महत्त्वाच्या सूचना