राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी भर; गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ नव्या रुग्णांची भर

korona

मुंबई – राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये आकडा हा ३० हजारांच्या पारच असल्याने दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत भर पडत आहे. यामुळे पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत असून मुंबई, पुण्यासारख्या शहरात देखील कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. आज तब्बल ३५ हजार ९५२ नव्याने कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर, काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९० टक्क्यांहून अधिक होते. मात्र, आता कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८७.७८ टक्क्यांवर घसरले आहे.

‘राज्यात आज 35952 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 20444 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2283037 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 262685 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78% झाले आहे.’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

देशातील टॉप-१० कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे. देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत टॉप-१० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. तर, पुणे जिल्ह्याचा क्रमांक यात अव्वल आहे. ‘पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बेंगलुरू अर्बन, नांदेड, जळगाव आणि अकोला या दहा जिल्ह्यांमध्ये सद्या सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण असून यातील बेंगळुरू हे शहर कर्नाटकातील तर इतर सर्व जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –