अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गावरान ज्वारीच्या आवकेत वाढ

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गावरान ज्वारीची आवक वाढू लागल्याचे चित्र दिसून आले. गेल्या आठवड्यात गावरान ज्वारीची २६८ क्विंटलची आवक झाली असून ज्वारीला अडीच हजार ते चार हजार रुपयांचा दर मिळाला. तुरीची २८७ क्विंटलची आवक झाली मात्र तुरीची हमीदरापेक्षा कमी दरानेच खरेदी केली जात आहे. तुरीला प्रतिक्विंटल तीन हजार पाचशे ते चार हजार सहाशे पंचवीस रुपयांचा दर मिळाला.

नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट

गुळाची ३७६ क्विंटलची आवक होऊन दर हजार नऊशे पन्नास ते चार हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला.मुगाची ४५ क्विंटलची आवक होऊन सहा हजार शंभर ते सात हजार रुपयांचा दर मिळाला. काबुली चण्याची १४ क्विंटलची आवक होऊन तीन हजार चारशे ते तीन हजार सातशे रुपयांचा दर मिळाला. हरभऱ्याची १९८ क्विंटलची आवक होऊन ३२७५ ते तीन हजार चारशे रुपयांचा दर मिळाला. मक्याची ३५ क्विंटलची आवक होऊन एक हजार नऊशे पन्नास रुपयांचा दर मिळाला.

जळगावात भरताची वांगी १६०० ते २००० रुपये

दरम्यान सोलापूर,अहमदनगर आणि  मराठवाड्यातील काही भागांतून येथे आवक होत असल्याने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत गावरान ज्वारीची आवक वाढत असते. यावर्षी आठवडाभरापासून काहीशी आवक वाढली असली तरी दरवर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी होत आहे.