कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे अजित पवारांनी नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन

अजित पवार

औरंगाबाद – गेल्या वर्षी कोरोनाने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला होता. आता कोरोनाचे सावट कमी झाल्याचं आकड्यांवरून समोर येत होतं. मात्र, यामुळे नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाची पुरेशी काळजी टाळल्यामुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा एकदा वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे. योग्य वेळी या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार तत्पर असल्याचं दिसून येत आहे.

कोरोनाच्या मागील लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्नांची वाढ झाली होती. यानंतर, दिवाळीनंतर पुन्हा ही संख्या वाढेल असं सांगण्यात येत होतं. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत असल्याचे व ब्रिटनमधील नव्या कोरोनाचा संसर्ग योग्य खबरदारीमुळे टळले होते. आता कोरोना रुग्नांची पुन्हा एकदा वाढत असल्याचं समोर येत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबाद दौऱ्यात भाष्य केलं आहे.

रुग्ण वाढत असल्यानं कोरोना संदर्भात कडक निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्यात येण्याचे संकेत अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले आहेत. ‘ग्रामस्थ आणि नागरिक मास्क वापरत नाहीत. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठकरे याना भेटणार असून, या बैठकीत कोरोनासंदर्भात कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील,’ असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं आहे. कोरोना रोखण्यासाठी वेळीच खबरदारी घेणं गरजेचं असल्याने नागरिकांनी सूचनांचं पालन करावं, असं आवाहन देखील यावेळी अजित पवार यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –