अमित शाह यांची शेतकरी नेत्यांसोबतची बैठक निष्फळ, त्यामुळे शेतकरी नेत्यांची आज केंद्र सरकारसोबत बैठक होणार नाही

अमित शहा

नवी दिल्ली – केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 14 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार होती. मात्र शेतकऱ्यांच्या भारत बंदला मिळालेला पाठींबा पाहता सरकारने नमतं घेत एक दिवसा आधीच म्हणजेच 8 डिसेंबरलाच शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.

या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांसोबत चर्चा केली. दरम्यान, सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील ही बैठकही निष्फळ ठरली आहे. बैठकीत शेतकरी प्रतिनिधी मात्र त्यांच्या मागणीवर ठाम असून सरकारने कृषी कायदे रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकरी नेत्यांची आज केंद्र सरकारसोबत बैठक होणार नाही.

अमित शाह यांच्याबरोबर शेतकरी नेत्यांची तब्बल अडीच तास बैठक झाली. परंतु या बैठकीत देखील शेतकऱ्यांच्या हाती काही आले नाही. कृषी कायदा मागे घेतला जाणार नाही, असे गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले. तसेच कायद्यात कोणते बदल करता येतील या संदर्भात केंद्र सरकार शेतकरी संघटनांना पत्राद्वारे देण्यास तयार आहे. मात्र कायद्यात बदल नको तर कायदा रद्द करा, यावर शेतकरी संघटना ठाम असून त्यांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळला. सिंघु बॉर्डरवर आज शेतकरी संघटनाची दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –