‘या’ निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेदारांना मिळणार मोठा फायदा

नोकरी

लातूर – लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना मोठा फायदा होणार आहे. शुभमंगल कर्ज, महिला बचत गट, छोटे ट्रॅक्टर यासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण असून शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा व आधार देणारा आहे.

या बरोबरच शेतकऱ्याच्या मुलीसाठी शुभ मंगल कर्जासाठी पूर्वी ९.५० टक्के व्याज दर होता, तो आता ८ टक्के असणार आहे. छोट्या ट्रॅक्टरसाठी पूर्वी १०.५० टक्के व्याज होते. ते आता ९.५० टक्के असेल. बचत गटाला पूर्वी २ लाख रुपये कर्जमर्यादा होती ती आता ३ लाख रुपये करण्यात आली आहे. बचत गटाला १२ टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करत असे आता १० टक्के दराने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

माजी मंत्री दिलीप देशमुख, बँकेचे चेअरमन अॅड. श्रीपत काकडे, उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केलाय. या निर्णयाचे पालकमंत्री अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनीही स्वागत केले आहे.

महत्वाच्या बातम्या –