आज दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत महत्त्वाची बैठक; महत्त्वपूर्ण निर्णय येण्याची शक्यता

बँक भरती परीक्षा

मुंबई – कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे.

तर, शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.

या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात उद्या ( ६ एप्रिल ) महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे. वर्षा गायकवाड यांनी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे. उद्या ही बैठक होणार आहे. या बैठकीला शिक्षण मंडळाचे विविध अधिकारी उपस्थित असतील.

या बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या यावर चर्चा होणार आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन घोषित झाला आहे. त्यामुळे शनिवारी होणार्‍या पेपरचं काय होणार, त्याचे कशाप्रकारे आयोजन करायचं, यावरही चर्चा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –