‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात १ हजार १७२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

कोरोना

परभणी – राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे परभणी जिल्ह्याने सुध्दा कोरोनाबाधितांच्या संख्येत हजारी गाठली. बुधवारी या जिल्ह्यात २४ तासात  एक हजार १७२ व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. तसेच 20 जणांचा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

महिनाभरापासून शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितच रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस खुप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आठ दिवसांपासून दररोज पाचशेवर व्यक्ती बाधित आढळून येत आहेत. बुधवारी बाधितांच्या संख्येने हजारचा आकडा पार केला आहे. 24 तासात एक हजार १७२ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या. सोमवारी व मंगळवारच्या आकडेवारीच्या तुलनेत बाधित व्यक्तींची संख्या दुपटीने वाढली आहे.  यावरूनच शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे.

बुधवारच्या या संख्येने सर्वसामान्य नागरिकांसह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा देखील हादरल्या आहेत. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येतसुध्दा मोठी वाढ झाली आहे. आठवड्याभरापासून अंदाजे दररोज 15 बाधित व्यक्ती मृत्यू  हाेत आहेत. कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण या जिल्ह्यात चिंताजनक आहे. 579 जवळपास व्यक्ती आतापर्यंत मृत्यू झाला आहे. बाधितांची संख्या आणि मृत्यूच्या संख्येचा तुलना केल्यास हे प्रमाण आरोग्य विभागाच्या दृष्टीने अक्षरशः चिंताजनक असल्याचा विषय ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या –