राज्यातील ‘या’ जिल्ह्यात काल दिवसभरात ७६६ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

कोरोना

पुणे – कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून भारतात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात ७६६ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ३९१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ७ जणांचा मृत्य झाला आहे. तर मृतांमधील तीन रूग्ण हे पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या २३१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २००४६२ इतकी आहे. तर पुण्यात ३२९० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण ४८८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत १९१६९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आज ६५५६ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आल आहे. पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच शहरात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता संपर्क शोध मोहीम राबवण्यात आली आहे. मात्र तरीही आकडे काही कमी होत नाहीयेत. यामुळे आता पुणेकरांची चिंता निशितच वाढलेली पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –