ढगाळ वातावरणामुळे खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी पिकांची पाहणी करून गरजेनुसार फवारणी करावी

हरभरा

अकोला – यंदा राज्यात हरभरा आणि तुरीची लक्षणीय पेरणी झाली असून, या पिकांपासूनच शेतकऱ्यांना मोठी आशा आहे. परंतु, अचानक झालेला वातावरणातील बदल हे अळ्यांसाठी पोषक असल्याने सर्वाधिक फटका हा हरभरा आणि तूर या पिकांनाच बसणार आहे.

शेतकरी बंधुंनी आपल्या पिकांची पाहणी करावी व अळी ३ प्रति झाड किंवा पिसारी पतंगाची अळी १ ते ३ प्रति झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगाचे नुकसान आढळल्यास व्यवस्थापनासाठी प्रति हेक्टर २० पक्षीथांबे शेतात उभारावेत. तसेच गरजेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी.

आठवडाभर असेच वातावरण कायम राहिल्यास तूर आणि हरभरा पिकांना फटका बसू शकतो. मात्र, गहू पिकावर त्याचा जास्त परिणाम होण्याची शक्यता नाही. खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी पिकांची पाहणी करून गरजेनुसार फवारणी करावी. असा सल्ला डॉ. पीडीकेव्ही अकोला येथील कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. उंदीरवाडे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –