राज्यात कोरोना वाढत असल्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

शाळा

मुंबई – गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. तर, कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्राला देखील मोठा फटका बसला आहे.

साताऱ्यासह, वाशिममध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत देखील असलेला धोका लक्षात घेता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा बंद करण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनावर सोपवला आहे. दरम्यान, कोरोनामुळे शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक देखील अनियमित झाले आहे.

यामुळेच साधारणतः फेब्रुवारी व मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या एप्रिल-मे मध्ये पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच, कोरोनाचा हाहाकार पुन्हा वाढत असल्याने या परीक्षा कशा घेणार ? असा सवाल निर्माण होत आहे. याबाबत राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेऊ शकते. तसे संकेत देखील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मदत व पूनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

‘दहावी आणि बरावी बोर्डाच्या परीक्षा महत्त्वाच्या आहेत. कारण ते महत्त्वाचं वर्ष आहे. पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यावे लागतील. त्यामुळे येणाऱ्या काळात याबाबत विचार करु आणि तुम्हाला त्याबाबतच लवकरच निर्णय सांगू,’ असं विधान वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे. तर, ‘महत्वाच्या असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे आणि ऑनलाईन परीक्षा घेणे याबाबतही चाचपणी सुरू आहे,’ असं भाष्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –