शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे आता ४० लाख ट्रॅक्टर दिल्लीत दाखल होतील

शेतकरी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या अडीच महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनकर्त्यांची दखल अद्यापही केंद्र सरकारने घेतली नाही. केंद्राच्या निषेधार्थ व आंदोलनाच्या समर्थनात देशभर आक्रोश व्यक्त केला जात आहे.

२६ जानेवारी रोजी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. यावेळी, पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्चक्री उडाली होती.

यातच आता संयुक्त किसान मोर्चाने रेल रोकोची हाक दिलेली असताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असेल तर आगामी काळात आणखी ४० लाख ट्रॅक्टर दिल्लीत दाखल होतील, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. ते हरियाणातील हिसारमधील खरक पुनिया येथे आयोजित महापंचायतीत बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली.

दरम्यान, किसान संयुक्त मोर्चाने आज देशभरात दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत रेल्वे रोको करण्याचे आवाहन केले होते. किसान मोर्चाच्या आवाहनानंतर देशात मोठ्या प्रमाणत रेल्वे अडवण्यात आल्या. २६ जानेवारीनंतर ट्रॅक्टर रॅलीदरम्यान धुमश्चक्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. महाराष्ट्रातही या आंदोलनाचे पडसाद उमटले. नांदेड जिल्ह्यातील किनवट रेल्वेस्थानकावर माकपाच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या –