कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे ‘या’ जिल्ह्यात लॉकडाउन लागण्याची शक्यता

संचारबंदी

नांदेड – शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी जिल्ह्यात २२९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर किनवटमधील अयप्पा स्वामीनगर येथील ७८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनपा क्षेत्रात आरटीपीसीआर तपासणीत ५७ तर अँटिजन तपासणीत १०१ रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६०६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण रुग्णसंख्या ही २४ हजार ५३८वर पोहोचली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ८९९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ६८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नवी इमारत ५५, किनवट कोविड रुग्णालयात ३८, मुखेड कोविड रुग्णालयात १०, हदगाव ४, महसूल कोविड केअर सेंटरमध्ये ५८, देगलूर कोविड रुग्णालयात ४ आणि खासगी रुग्णालयात १०७ रुग्ण उपचार घेत आहेत.

मनपाअंतर्गत गृहविलगीकरणात ३३० तर तालुक्यांतर्गत गृहविलगीकरणात १७० रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी ११४ कोरोना बाधितांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून २२ हजार ८१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नांदेडमध्ये लॉकडाउनची जोरदार चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या –