कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पोलिस

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने औरंगाबाद पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरात रिक्षाचालक विनामास्क वाहन चालवताना आढळला तर त्याची रिक्षा जप्त करण्यात येणार आहे.

माहितीनूसार, औरंगाबादेत तब्बल 35 हजारांपेक्षा जास्त रिक्षाचालक आहेत. ते दररोज प्रवाशांना घेऊन फिरतात. त्यांनी मास्क न घातल्यास कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाकडून लोकांना वारंवार मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, लोक या सूचना गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून आता रिक्षाचालकांवर कारवाई केली जात असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी माध्यमांना दिली.

दरम्यान, यापूर्वी कोरोना रुग्णांसाठी होम आयसोलेशनला परवानगी दिली होती. यामध्ये कोरोना रुग्णास घरात राहून उपचार घेता येत होते. त्याकरिता डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेतले जात होते. मात्र आता ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालय किंवा पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावेच लागेल. घरी राहून उपचार घेता येणार नाही, असे पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी शनिवारी सांगितले.

वातावरणातील बदल, तसेच लग्न समारंभास गर्दी, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी जाणे, शहरात फिरणे, मास्कचा वापर टाळणे हे प्रकार आता नागरिकांनी थांबवावेत, असे आवाहनही पाडळकर यांनी केले. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात होम आयसोलेशनला परवानगी होती. त्यावेळी अनेकांनी होम आयसोलेशनला पसंती दिली होती.

महत्वाच्या बातम्या –