२७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्यामुळे शिक्षकांना जिल्हाधिकारी यांनी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

शाळा

औरंगाबाद – इयत्ता ५ वी ते ८वी पर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील इयत्ता ५वी ते ८वीच्या सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी यांनी पत्राद्वारे सर्व शाळांना आदेशित केले आहे. यात जिल्ह्यातील महानगरपालिका हद्दीव्यतिरिक्त सर्व आस्थापनांच्या इयत्ता ५वी ते ८वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यास येत असून शाळांनी त्या अनुषंगाने कार्यवाही करावी. शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे.

गट शिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील आरटीपीसीआर चाचणी होणार असलेल्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून चाचणी वेळेत पूर्ण होईल याचे नियोजन करावे. ज्या शिक्षकांची चाचणी होऊ न शकल्यास किंवा चाचणी झाली परंतु अहवाल प्राप्त न झाल्यास त्या शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे परवानगी देऊ नये असे आदेशात म्हंटले आहे.

वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण होणार

शाळा सुरू करण्यापूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी ग्रामपंचायत स्तरावरून सर्व वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करणे, शाळांना पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन उपलब्ध करून देणे यासंबंधीचे स्वतंत्र आदेश पारित करण्याचेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –