नवी दिल्ली – मराठा आरक्षणासंदर्भात सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना श्री.चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत काल झालेल्या वकिलांच्या बैठकीबाबत तसेच या प्रकरणाच्या सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी खासदार पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाबाबत प्रधानमंत्री यांची भेट घ्यावी, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याबाबतही यावेळी चर्चा झाली. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या ऍटर्नी जनरलला नोटीस दिली होती. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने बाजू मांडणे केंद्र सरकारला क्रमप्राप्त झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडताना केंद्राने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा, १०२ व्या घटना दुरुस्तीचा राज्यांच्या अधिकारांवरील परिणाम आदींबाबत सकारात्मक बाजू मांडली तर एसईबीसी आरक्षणाच्या लढ्याला मोठी मदत होऊ शकेल. महाराष्ट्राच्या मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला तर अनेक राज्यातील आरक्षणाचे प्रश्नही निकाली निघू शकतील. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची असून, त्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने प्रधानमंत्री यांची भेट घ्यावी, असा हेतू आहे. या भेटीकरिता खासदार श्री. पवार पुढाकार घेणार असल्याची माहिती श्री.चव्हाण यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या –
- अजून वेळ गेलेली नाही, केंद्र सरकारने आडमुठेपणाचे धोरण सोडून तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत – नवाब मलिक
- राज्यातील 6 जिल्ह्यांना बर्ड फ्ल्यूचा धोका, ‘या’ जिल्ह्यातील 80 हजार कोंबड्या मारण्यात येणार
- ‘हे’ उपाय करून पाठदुखी मिनिटांत दूर करा, माहित करून घ्या
- कृषी कायद्यांच्या अमंलबजावणीला स्थगिती देणं हे सरकारचे काम होते, हे काम सुप्रीम कोर्टाचे नव्हते