कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट; राज्यात कांद्याचे दर कोसळले

कांदा निर्यात बंदी

उस्मानाबाद: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने लॉकडाऊन लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कांद्याची आवक दरात ४० टक्के घसरण झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. येथील बाजार समितीमधील सर्व व्यापाऱ्यांचा सरासरी दररोज १५ ट्रक कांदा आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आदी राज्यात पाठवला जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार लॉकडाऊन करण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी कांदा काढून विक्रीस आणण्यासाठी सुरुवात केल्याने बाजार समितीमधील कांदा व्यापाऱ्यांकडे आवक वाढली आहे. एप्रिलमध्ये कांद्याचे भाव ४० टक्के कोसळल्याने झालेला खर्चही पदरात पडत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

तालुक्यात गतवर्षी पर्जन्यमान समाधानकारक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. परंतु, कांदा बाजारपेठेत येईपर्यंत कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे सर्व हॉटेल, रेस्टॉरंट बंद पडल्याने कांद्याच्या मागणीवर परिणाम झाला. त्यामुळे कांद्याचे दर कोसळले असून २०० ते १२०० रुपये क्विंटल दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. मागील ५ ते ६ वर्षापासून बाजार समितीने कांदा व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून दिल्यामुळे या परिसरात वर्दळ वाढली.

महत्वाच्या बातम्या –