राज्यातील आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट

उपबाजार

परभणी – कोरोना विषाणूने राज्यात पुन्हा एकदा तोंड वर काढल्याने शेतकरी अडचणी सापडले आहे. परभणीत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला आहे. आठवडी बाजार बंद असल्याने टोमॅटो, काकडी, मेथी, मिरची या सारख्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळतोय. आठवडी बाजार बंद होण्यापूर्वी टोमॅटोला १९० रुपये कॅरेटचा भाव होता मात्र, तोच भाव आता ४५ रुपयांवर आला आहे. टोमॅटोप्रमाणेच इतर भाज्यांच्या दरावरही परिणाम झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करण्यास तयारी नाही. परिणामी भाजीपाल्याचे दर पडले आहेत आणि शेतकऱ्यांना भाजीपाली कवडीमोल भावात विकावा लागत आहे. परभणीतील अनेक गावांत शेतकऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी टोमॅटोची लागवड केली आहे. टोमॅटोच्या पिकासाठी एकरी जवळपास ७० हजार रुपये खर्च लागतो. याशिवाय काढणीसाठी मजूर, वाहतूक हा खर्च पकडला तर तो ९० हजारांच्या घरात जातो. मात्र, आता बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. बाजार कधी सुरू होईल वाट आता शेतकरी पाहत आहेत.

कोरोना विषाणू देशात दाखल झाल्यापासून शेतकऱ्यांचे हालच सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोना अटोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने अनलॉकची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली. तेव्हापासून शेतकरी हळूहळू आर्थिक संकटातून सावरत होता. मात्र, पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठा बंद करण्यात आल्या आणि शेतकरी पुन्हा संकटात सापला आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला, तर जिल्ह्यात लॉकडाऊनची परिस्थिती उद्बवू शकते, त्यामुळे शेतकरी आणखीनच आडचणीत सापण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट

कोरोना येऊन वर्ष झाले. तेव्हापासून आमचे हाल सुरू आहेत. अशातच पालेभाज्यांच्या माध्यमातून थोडाफार पैसा हातात पडेल अशी आशा होता. मात्र, आता आठवडी बाजर बंद झाल्याने व्यापारी माल विकत घेत नाहीयेत. त्यांमुळे आमच्यासमोर मोठे आर्थिक संकट आता उभे राहिले असल्याचे परभणी येथील शेतकरी मुंजाजी दुधाटे यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगितले.

“भाजीपाला, फळे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच उपाययोजना”

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहे. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठीच आठवडी बाजार बंद ठेवले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येतील असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या –