मोठी बातमी – राज्याच्या कृषी क्षेत्रात तब्बल 11 टक्के वाढ

अजित पवार

मुंबई – महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्याचा अर्थसंकल्प आज (दि. 8 मार्च) उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार मांडत आहेत. कोरोना काळात राज्याच्या महसुलात मोठी घट झाली असून आपत्कालीन स्थितीतून सावरण्यासाठी राज्याचा खर्च मात्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीतील वित्तीय तूट ही साहजिकच वाढली आहे.

कोरोना काळात करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे उद्योग सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या काळात औद्योगिक चक्र ठप्प झाल्यामुळे मागणीत घट झाली. तसेच, उद्योगांची उत्पादन क्षमता देखील मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची नोंद झाली आहे. मात्र, भारताची मूळ ओळख कृषिप्रधान देश अशी आहे. याचाच प्रत्यय अजित पवार यांनी मांडलेल्या आकडेवारीतून समोर आला आहे.

उद्योग सेवा क्षेत्रात जरी घसरण झाली असली तर कृषी क्षेत्रात मात्र तब्बल ११ टक्के वाढ झाल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी म्हणूण प्रयत्न केले असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. तसेच, येत्या काळात देखील कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
3 लाख मर्यादा पीक कर्ज घेऊन वेळेत परत करणाऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्यात येईल. एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटींच्या योजनेची घोषणा, तर, कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1,500 कोटींचा महावितरणला निधीची तरतूद करण्यात येत आहे. तसेच, राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केलेल्या विकेल ते पिकेल योजनेला 2100 कोटी रुपयांचा नदीची तरतूद करण्यात आल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या –