मोठी बातमी – दिल्लीतील शेतकरी आंदोलनात १८ पोलीस जखमी तर एकाची प्रकृती गंभीर

नवी दिल्ली – दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देखील हे आंदोलन सुरु असून आज शेतकऱ्यांनी दिल्लीतील सीमांमधून आत येऊन ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे.

राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये प्रचंड धुमश्चक्री पाहायला मिळाली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर कूच केली. यादरम्यान झटापट झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज तर शेतकऱ्यांनी दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर जाऊन झेंडा फडकवला. या धुमश्चक्रीत अनेक पोलीस जखमी झाले आहेत. तर १८ पोलिसांना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच एका पोलीस कर्मचार्‍याची प्रकृती गंभीर आहे. शिवाय अनेक शेतकऱ्यांनाही गंभीर दुखापती झाल्या आहेत.

दरम्यान, या घटनेवर संयुक्त किसान मोर्चाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शांतता राखणे गरजेचे आहे. असे आवाहन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. तसेच आमचे लोक शांततेत आंदोलन करत आहे. गोंधळ पसरविण्याचा प्रयत्न करणारे राजकीय पक्षाचे लोक आहेत असे मत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या –