मोठी बातमी – ‘या’ जिल्ह्यात तब्ब्ल २४ तासांत ४५९ नव्या रुग्णांची नोंद

कोरोना

औरंगाबाद – जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाच्या ४५९ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील ३५३, तर ग्रामीण भागातील १०६ जणांचा समावेश आहे. दरम्यान, मनपा हद्दीतील १५२ आणि ग्रामीण भागातील २७ जणांना यशस्वी उपचारानंतर सुटी देण्यात आली.

शुक्रवारी मुकुंदवाडीतील ६५ वर्षीय पुरुष, खुलताबाद नांदराबाद येथील ६६ वर्षीय पुरुष, नंदनवन कॉलनीतील ७९ वर्षीय पुरुष, वडोदबाजार येथील ५८ वर्षीय महिलेचा घाटीत, तर खासगी रुग्णालयात ७३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ५२ हजार १०३ वर पोहोचली, तर आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात १ हजार २८४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४७ हजार ९०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार ९१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आणखी २ कोविड केंद्रे सुरू
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मनपाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृह तसेच सिपेट वसतिगृहातील कोविड केअर सेंटर हे दोन कोविड केंद्रे सुरू केले आहेत. मनपाचेही कर्मचारी कमी पडत असल्यामुळे कोविड कामासाठी २८५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये एमबीबीएस डॉक्टर १३, बीडीएस ४५, आयुषचे ५७, स्टाफ ६५, एएनएम १७, वॉर्डबाय १९, फार्मासिस्ट १०, लॅब टेक्नीशियन ४५, एक्स-रे टेक्नीशियन ७, ईसीजी टेक्नीशियन २, स्टोअर कीपर २, डाटा एंट्री ऑपरेटर ४ यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –