मोठी बातमी – वीजबील सवलत योजनेअंतर्गत ५० हजार ४३२ कृषिपंपधारकांचे ५३८ कोटी माफ

महावितरण

उस्मानाबाद – राज्य सरकारने वीज बिल सवलत योजना जाहीर केली होती. यानुसार जिल्ह्यातील एक लाख ५० हजार ४३२ कृषिपंपधारकांचे ५३८ कोटी ५१ लाख रुपयांचे वीजबिल तसेच १७५.८८ लाखांचे दंडव्याज माफ होणार आहे. जिल्ह्यातील कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे १८२२ कोटी ३४ लाखांची थकबाकी असून त्यातून ही रक्कम वजा केली जाणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी महावितरणने कडक धोरण आवलंबले आहे.

सप्टेंबर २०१५ अखेरच्या थकबाकीवरील सर्व विलंब आकार व सर्व व्याज रद्द करुन, ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०२० या ५ वर्षांच्या कालावधीतील थकबाकीवर कर्ज घेतलेल्या दराने व्याज आकारणी होईल. त्यानुसार निश्चित होणारी थकबाकी एका वर्षात भरणाऱ्या शेतकऱ्यास ५० टक्के सवलत मिळेल. उस्मानाबाद जिल्ह्याची आकडेवारीनुसार १ लाख ५० हजार कृषिपंपधारकांकडे सप्टेंबर २०२० अखेर एकूण १८२२ कोटी ३४ लाख रुपयांची वीजबिलाची थकबाकी आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कृषि धोरणानुसार यातील ५३८ कोटी ५१ लाख रुपये महावितरणने राइट ऑफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच व्याज सवलत योजनेंतर्गत १७५ कोटी ८८ लाख रुपयांची रक्कमही माफ होणार आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा १८२२ कोटींवरून ११०७ कोटी ९५ लाखावर येत आहे. या उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी सध्या महावितरणने जोरदार मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत ज्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडे घरगुती अथवा कृषिपंपाची महावितरणची वीजबिलाची थकबाकी आहे, त्यांचा माहे फेब्रुवारी २०२१ चा पगार होणार नाही, असे स्पष्ट आदेश महावितरणने काढले आहेत. जिल्ह्यात सर्वाधीक थकबाकी ही कळंब तालुक्यात आसल्याचे महावितरणने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या –