मोठी बातमी – राज्यात हरभरा, तूर, मूग, उडीद डाळीच्या भावत मोठी वाढ

डाळ

औरंगाबाद – मागच्या मोसमात झालेल्या अतिवृष्टीमुळे कृषी मालाच्या उत्पादनामध्ये खुप मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने सर्व डाळीचे भाव वाढत आहेत. या मध्ये सर्व हरभरा, तूर, मूग, उडीद अनुक्रमे १०० री च्या घरात जाऊन पोहचली आहे. त्यामुळे महिलांना घरातील आर्थिक बजेट मात्र पुर्णपणे कोलमडले आहे.

किरणासह भुसार बाजारात लागणाऱ्या फलकानुसार उडीड , मुगाची डाळ १०२ ते १०४ रुपये प्रतिकिलो दर आढळून येतात. याच बरोबर तूर दाळ देखील १०० रीच्या घरात येवू लागली आहे. तिचा दर आता ९४ ते ९६ रुपयांचा दर प्रतिकिलो झाला आहे. हरभऱ्याची डाळीमध्ये मात्र खुप मोठी वाढ झालेली दिसून येत नाही. मागच्या वर्षी कोरोना तसेच लॉकडाऊनचा परिणाम खरेदी – विक्री वर झाला आहे.

पुन्हा २०२१ मधील फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागामध्ये कमी माणसामध्ये लग्नाला परवानगी मिळत असल्याने शहरासह खेड्या – पाड्यात देखील किरकोसह ठोक व्यापारी देखील व्यवसाय म्हणावा तसा होत नसल्याचे सांगत आहेत. मागच्या वर्षी डाळीचे भाव मात्र नियंत्रणामध्ये होते. तर आता मात्र दिवसेंदिवस हे भाव गगानाला भिडत आहेत. मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्ठीमुळे कृषी उत्पादन कमी झाले, तसेच बाजारात देखील कमी माल आला असल्याने डाळीचे भाव वाढत आहेत. एप्रील मध्ये ग्राहक वाढले तर पुन्हा दरवाढ होवू शकेल असे शहरातील किरकोळ व्यापारी गणेश सारडा यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –