मोठी बातमी – राज्यात ८ दिवसांच कडक लॉकडाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला इशारा

उद्धव ठाकरे

बई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. संध्याकाळी 5 वा. या बैठकीला सुरुवात झाली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बैठक सुरु होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आता लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही अस ठोस मत व्यक्त केले आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित निर्णय घेण्याची ही वेळ आहे. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच आठ दिवसाचा लॉकडाऊन करायचा इशारा दिला. आता कडक निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे.

त्यामुळे आठ दिवसानी हळू हळू इतर सुविधा सुरु करू, असं म्हणत आठ दिवस तरी कडक निर्बंध पाळायला हवा मात्र इतर पक्षातील मान्यवरांची, तज्ञाची मते जाणून घेतल्यानंतर आता १४ दिवसांचा लॉककडाऊन घेण्यास काहीच हरकत नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी १४ दिवसांच्या लॉककडाऊनचा विचारही करायला काही हरकत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या –