मोठी बातमी – राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सलग चोथ्या दिवशी ४०० हून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद

कोरोना

औरंगाबाद – जिल्ह्यात कोरोनाच्या ४२६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एका ३६ वर्षीय तरुणासह ५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील तिघांचा तर जालना व परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. रविवारी आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३४८ रुग्ण मनपा हद्दीतील आहेत, तर ७८ रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून रोज रुग्णसंख्या ४०० वर जात आहे.

जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ५२ हजार ९६९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ हजार २९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार २१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रविवारी १६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे औरंगाबामधील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४८ हजार ४५९ झाली आहे. तर रविवारी माया नगरातील ६६ वर्षीय पुरूष, परभणी जिल्ह्यातील ६५ वर्षीय महिला व जालना जिल्ह्यातील ८५ वर्षीय महिलेचा घाटीत मृत्यू झाला. तर एन सहा सिडकोतील ३६ वर्षीय पुरुष व केळीबाजारातील ८२ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

औरंगाबादेत ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन
औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादमध्ये येत्या ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन ४ एप्रिलपर्यंत राहिल. त्याचबरोबर शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.

महत्वाच्या बातम्या –