मोठी बातमी – राज्यातील ‘या’ २८ जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा

पाऊस

औरंगाबाद – मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात १८ व १९ फेब्रुवारी असे दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील २८ जिल्ह्यांना गारपीट, पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी नागपूर शहर, भंडारा, बाळापूर, खामगाव, परिसरात हलका पाऊस झाला. तसेच, औरंगाबादमधील काही गावांत गारपीट झाली.

औरंगाबादेत गारपीट, परभणीत मुसळधार

औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी भागात बुधवारी सायंकाळी गारांसह पाऊस झाला. करमाडनजीक लाडसावंगीतही रात्री साडेनऊच्या सुमारास २० मिनिटे गारपीट झाली. परभणी जिल्ह्यात परभणी, पोखर्णी, दैठणा इत्यादी भागांत मुसळधार पाऊस झाला.

गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील २8 जिल्ह्यांना गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, औरंगाबाद, जालना धुळे, जळगाव, या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सोलापूर, मराठवाड्यात परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, नगर, आणि विदर्भातील नागपूर, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, यवतमाळ बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –