मोठी बातमी – राज्यातील ‘या’ जिल्ह्यात २७ आणि २८ फेब्रुवारीला जनता कर्फ्यू

ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर

लातूर – जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. खबरदारी म्हणून दिनांक २७ आणि २८ फेब्रुवारी म्हणजेच शनिवार आणि रविवारी लातूरात जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी घेतला आहे. या जनता कर्फ्यू दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलय.

लातूर जिल्ह्यात बुधवारी ९८ कोरोनाबाधिक रुग्णांची भर पडली आहे. तर उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने कडक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. लातूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २५ हजारांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात सध्या ३९७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत मृतांचा आकडा ७०३ वर पोहोचला आहे.

फेसबुक लाईव्ह संवादाच्या माध्यमातून बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, लोकांनी घाबरून जाण्याची परिस्थती नाही. जिल्हा प्रशासन कोणतीही परीस्थिती हाताळायला सज्ज आहे. माञ कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी लातूर जिल्हावासीयांनी येत्या शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. अनावश्यक बाहेर फिरणे टाळावे. व स्वतःहून जनता कर्फ्यू पाळावा. जेणेकरून कोवीड-१९ विषाणूची साखळी आपल्याला तोडता येईल, असे त्यांनी सूचित केले.

त्याचबरोबर नागरीकांनी मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सतत हात धुणे याचा अवलंब करावा. मंगल कार्यालयांसारख्या ठिकाणी होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथवीराज बी. पी. यांनी केले आहे. पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यावेळी म्हणाले की नागरीकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. महत्वाच्या चौकांमध्ये मास्क न वापरणाऱ्यांना दंड आकारला जात आहे. नागरीकांनी या पथकांना सहकार्य करावे. अनावश्यक वाद घालणे टाळावे, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –