मोठी बातमी – राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोरोना सातत्याने वाढत असल्यामुळे ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर

संचारबंदी

हिंगोली : कोरोना सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंखेमुळे हिंगोली जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत. हिंगोली आगारातून जाणाऱ्या एसटी बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन दरम्यान केवळ अत्यावश्य सेवा रुग्णालये, पेट्रोल पंप, सरकारी कार्यालये, बँक यांना परवानगी देण्यात आली आहे. तर, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे आणि मंगल कार्यलये बंद ठेवण्यात येणार आहे. दुध विक्रेत्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवूनच कार्यालयास जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

हिंगोली बसस्थानकात बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड अँटिजन चाचणी केली जात आहे. हिंगोली आगारातून बसफेऱ्या सोडण्यात आल्या नाहीत. मात्र इतर आगारांच्या आलेल्या बसमधून आलेल्या प्रवाशांची बसस्थानकावरच रॅपिड अँटिजन चाचणी सुरू करण्यात आली. यात दुपारपर्यंत ४ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

सध्या २३२ रुग्णांवर उपचार सुरू
हिंगोली जिल्ह्यात मागील ४ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या २३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ७ मार्चदरम्यान संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेत असल्याचे जयवंशी यांनी म्हटले आहे. नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

महत्वाच्या बातम्या –