मोठी बातमी – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार १५ मार्चपर्यंत बंद

आठवडे बाजार

परभणी – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परभणी जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार 15 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी दिले आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याने गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र वावरताना नागरिक सुरक्षित सामाजिक अंतराचे पालन न करणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, तोंडावर मास्क न लावता फिरत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना संसर्गात होणारी वाढ पाहता सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे नमूद करीत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १५ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद ठेवावेत, असे आदेश दिलेत.

महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, आदींनी या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करावी त्यांच्यावर याबाबत जबाबदारी राहणार असल्याचेही आदेशात मुगळीकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात येईल, असाही इशारा जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आदेशात दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –